अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, ३१ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६१३ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये सिंधी कॅम्प, न्यू भिम नगर, जठारपेठ, मुर्तिजापर व माना येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.४३८ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६१३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०७० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४३८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- १४४पॉझिटीव्ह- ५निगेटीव्ह- १३९
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२६६+३४७=२६१३मयत-१०५,डिस्चार्ज- २०७०दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४३८