शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

CoronaVirus in Akola : पाच ‘निगेटिव्ह’; अकोल्याचा एक संशयित हिंगोलीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:20 AM

सर्वच रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

ठळक मुद्देअकोल्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला तरी, टांगती तलवार कायम आहे.४८ नागरिक अद्याप ‘होम क्वारंटीन’मध्ये आहेत.शुक्रवारी १४४ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले असून, सर्वच रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. ही बातमी अकोलेकरांना दिलासा देणारी असली तरी, धोक्याची घंटा कायम आहे. अकोल्यातील शासकीय सेवेत कार्यरत ३० वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर हिंगोली येथे आयसोलेशन कक्षात कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून दाखल आहे. मूळ हिंगोली येथील रहिवासी असलेले ते प्रशिक्षणार्थी डॉक्टर अकोल्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. २३ मार्च रोजी प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी शासकीय शिक्षण संस्थेतून सुटी घेतली. हिंगोली येथे पोहोचताच २७ मार्च रोजी त्यांना तेथील आयसोलेशन कक्षात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून, दोन दिवसांनंतर अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे सध्यातरी अकोल्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला तरी, अकोलेकरांवर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.

४८ नागरिक ‘होम क्वारंटीन’!विदेशातून आलेल्या १२३ प्रवाशांपैकी १२२ प्रवासी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहेत. प्राथमिक वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना ‘होम क्वारंटीन’मध्ये ठेवण्यात आले आहे. यातील ६८ प्रवासी नागरिकांनी ‘होम क्वारंटीन’चा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची यातून सुटका करण्यात आली. ४८ नागरिक अद्याप ‘होम क्वारंटीन’मध्ये आहेत. एक प्रवासी अद्यापही आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात नाहीत.

सर्वोपचारमध्ये १९५९ रुग्णांची वैद्यकीय तपासणीसर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षामध्ये आतापर्यंत एक हजार ९५९ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये शुक्रवारी १४४ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस