शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

‘कोरोना’चे सावट; अकोला शहराचा सर्व्हे करण्यासाठी ४८ पथकांचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 1:44 PM

संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यासाठी ४८ पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेतला.

अकोला: कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना गुढीपाडव्याच्या सबबीखाली महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र बंद असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे शहरात मुंबई, पुणे, नागपूर तसेच परराज्यातून दाखल झालेल्या नागरिकांची नोंद होऊ शकली नाही. वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारावर भाजप लोकप्रतिनिधींसह महापौर अर्चना मसने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर गुरुवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यासाठी ४८ पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेतला.शहरात मुंबई, पुणे, नागपूर यासह परदेशातून दाखल झालेल्या नागरिकांच्या नोंदी ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयुक्त संजय कापडणीस यांनी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर सोपविली होती. कोरोना विषाणूचे गांभीर्य नसल्यामुळे की काय, मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सुरुवातीपासूनच बेफिकीर असल्याचे समोर आले आहे. गत ६ मार्चपासून शहराच्या विविध भागात परदेशातून तसेच पुणे, गोवा, मुंबई, भोपाळ यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झाले आहेत. याविषयी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही बाहेरगावाहून येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवल्या जात नसल्याची गंभीर बाब उजेडात आली होती. या प्रकाराची दखल घेत गुरुवारी आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मनपा प्रशासनाचा आढावा घेतला. यावेळी आजपर्यंत शहरात दाखल झालेल्या सर्वच नागरिकांची नोंद घेण्यासाठी ४८ पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पथकात मनपा कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांचा समावेश राहणार आहे.महापौरांचे निर्देश; अंमलबजावणीकडे लक्ष* जंतुनाशक फवारणीसाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवा* कोरोनाच्या धर्तीवर गैरहजर किंवा कामचुकारपणा करणाºयांना तंबी* मनपाच्या उपाययोजनांची नागरिकांना ‘एसएमएस’द्वारे माहिती द्या* चारही झोनमधील भाजी बाजारात १ मीटर अंतराची आखणी करा* अकोलेकरांची समस्या निकाली काढण्यासाठी सजग राहा* कोणत्याही समस्येसाठी २४ तास टोल फ्री हेल्पलाइन नंबर 18002335733/0724-2434412 जारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका