लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढीसोबतच त्यातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. यामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मोठ्या जिल्ह्यांचा विचार केल्यास त्यामध्ये अकोला जिल्ह्याचा ‘रिकव्हरी रेट’ सर्वोत्तम आहे. रविवारी सकाळपर्यंत अकोल्याचा रिकव्हरी रेट ८१.२२ टक्के होता, तर त्या पाठोपाठ मुंबई ८०.४१ टक्क्यांवर दुसºया क्रमांकावर आहे.राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. सुरुवातीला केवळ महानगरांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता गावखेड्यांपर्यंत पोहोचला आहे. रुग्णसंख्या आणि मृत्युदरातील वाढीसोबतच राज्यातील बरे होणाºया रुग्णांचेही प्रमाण लक्षणीय आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीच्या आधारे बरे होणाºया रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण अकोला जिल्ह्यात आहे. येथील रुग्ण रिकव्हरी रेट ८१.२२ वर आहे. तर दुसºया क्रमांकावर मुंबई असून, येथील रिकव्हरी रेट ८०.४१ आहे. राज्यात सर्वात कमी रिकव्हरी रेट पुणे जिल्ह्याचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह येणाºया रुग्णांचे प्रमाण वाढत असले, तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागातर्फे त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देते.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला