- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वाधिक चिंताजनक व चर्चेचाही ठरला आहे. अकोल्यात रुग्णवाढीचा वेग धक्कादायक आहेच; मात्र त्यासोबतच मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचीही संख्या विदर्भात सर्वाधिक नोंदविली गेली आहे.कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ अशी अकोल्याची ओळख या वाढत्या रुग्ण संख्येमुळे झाली आहे. नागपूरसारख्या विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातही रुग्णवाढीचा वेग हा अकोल्याच्या तुलनेत कमी आहे. नागपूरमध्ये ३०० रुग्णांचा टप्पा हा ६३ दिवसांत गाठला होता.अकोल्यात मात्र अवघ्या ४३ दिवसांतच ३०० च्या वर रुग्ण संख्या झाली असून, आता चारशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे, नागपुरात पहिला रुग्ण हा ११ मार्च रोजी आढळला होता. अकोल्यात ७ एप्रिलपासून सुरुवात झाली. नागपूरपेक्षा तब्बल महिनाभर उशिराने रुग्ण आढळूनही अकोला आता नागपूरपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाग्रस्त होत आहे.नागपुरात ७८ टक्के, अकोल्यात ५८ टक्के ‘कोरोना’मुक्तनागपुरात शुक्रवार दुपारपर्यंत ३९५ रुग्ण व ३१० ‘कोरोना’मुक्त तर अकोल्यात ३२४ रुग्ण व १९१ ‘कोरोना’मुक्तांची नोंद होती. टक्केवारीनुसार नागपुरात ७८.४८ टक्के तर अकोल्यात ५८.९५ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले.अमरावतीपेक्षाही अधिक बळीविदर्भात अकोल्यामध्ये कोरोना बळींची संख्या सर्वाधिक आहे. शुक्रवारपर्यंत तब्बल कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहेत. यापैकी २२ जणांचा मृत्यू ‘कोविड-१९’ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्याखालोखाल अमरावतीमध्ये १३ बळी गेले असून, नागपुरात केवळ ७ तर ११२ रुग्ण आढळलेल्या यवतमाळमध्ये कोणलाही जीव गमावावा लागलेला नाही.‘अॅक्टिव्ह’ रुग्णांमध्येही अकोलाच अव्वल!नागपूर, अमरावती व यवतमाळ हे विदर्भात सर्वाधिक रुग्ण असणारे जिल्हे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत उपचार सुरू असलेले अर्थात अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये अकोल्याची संख्या सर्वाधिक आहे.शुक्रवार संध्याकाळपर्यंत अकोल्यात.... ..रूग्ण होते. तर हीच संख्या नागपुरात १११, यवतमाळमध्ये केवळ १५ एवढी आहे.
CoronaVirus in Akola : रुग्णवाढीचा वेग अन् वाढता मृत्यूदर चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:11 PM