शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

CoronaVirus in Akola : तब्बल ४०२ अहवाल निगेटिव्ह; २१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 6:14 PM

एकूण ४२३ कोरोना संसर्ग चाचणी अहवालांपैकी तब्बल ४०२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे उर्वरित २१ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.एकूण बाधितांची संख्या २०४९ झाली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना संसर्ग थांबला नसला, तरी त्याचा वेग मात्र कमी झाल्याची चिन्हे आहेत. शुक्रवार, १७ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त एकूण ४२३ कोरोना संसर्ग चाचणी अहवालांपैकी तब्बल ४०२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित २१ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २०४९ झाली आहे. दरम्यान, २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारीवारी सकाळी २९७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांमध्ये अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा आणि पातूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. यामध्ये उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर, मुर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, १६६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २८२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२७ जणांना डिस्चार्जशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून २२ तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण २७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये तेल्हारा, मुर्तिजापूर आणि मलकापूर-अकोला येथील रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या २२ जणांपैकी आठ जण बाळापूर येथील, पाच जण अकोट येथील,  चार जण महान येथील, दोन जण चांदूर येथील, तर बार्शीटाकळी, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.   

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या