अकोला : गत चार महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोनाचा कहर सुरुच असून, रुग्णवाढीचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. बुधवार, ५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २५ असे एकूण तब्बल ७० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २८२५ झाली आहे. दरम्यान, ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत सद्यस्थितीत ४२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २४६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिव्हि ४५अहवालांमध्ये २१ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये दाळंबी गावातील नऊ जणांसह, मोठी उमरीतील विठ्ठल नगर भागातील पाच, बोरगाव मंजू व वाडेगाव येथील प्रत्येकी तीन, मलकापूर येथील चार जण, आगर येथील तीन जण, बाभूळगाव येथील दोन जण, अकोट, डाबकी रोड व आगर येथील प्रत्येकी दोन, मुर्तिजापूर, संताजी नगर, बार्शीटाकळी, रिधोरा, दहिहांडा, शिवर, संकल्प कॉलनी, कोठारी, केशव नगर व अग्रसेन भवन येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.४३ जणांना डिस्चार्जदरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २४ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १३ जणांना, तर हॉटेल रेजेन्सी येथून सहा जणांना अशा एकूण ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४३५ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २२८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
CoronaVirus in Akola : दिवसभरात तब्बल ७० पॉझिटिव्ह; ४३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 7:25 PM