अकोला : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, सोमवार, १ जून रोजी यामध्ये २४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर दुपारी फिरदौस कॉलनी परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६०५ झाली असून, मृतकांचा आकडाही ३४ वर गेला आहे. दरम्यान, सोमवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. रविवार, ३१ मेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५८१ होती. यामध्ये सोमवारी आणखी २४ रुग्णांची भर पडून हा आकडा ६०५ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून सोमवारी दिवसभरात १०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १२ पुरुष आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनिकट पोलीस लाईन, नुरानी मशिद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व पोपटवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. दरम्यान, सोमवारी दुपारी फिरदौस कॉलनी परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सदरमहिलेला २९ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत ३४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचाही समावेश आहे. आतापर्यंत ४४२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आता १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सोमवारी १० जणांना डिस्चार्जएकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे बरे होणाºयांचा आकडाही दिलासा देणारा आहे. सोमवारी दुपारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना घरी तर उर्वरीत आठ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. प्राप्त अहवाल-१०७पॉझिटीव्ह-२४निगेटीव्ह-८३ एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६०५मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४४२दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३०