अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा हैदोस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, सोमवार, ७ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १६६ झाला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८३, नागपूरच्या खासगी प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये चार असे एकूण ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७०० वर गेला आहे. दरम्यान, ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८३ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये ३१ महिला व ५२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ३२ जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पळसो बढे येथील चार जण, चिखली ता मुर्तिजापूर व लहान उमरी येथील तीन जण, अकोट व आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी, तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पारद येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये कंडी ता. मुर्तिजापूर येथील चार, खेडकर नगर व निंबा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, हातगाव ता. मुर्तिजापूर येथील दोन, शास्त्री नगर, शिरसो ता. मुर्तिजापूर, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, मलकापूर, इंदिरा कॉलनी, गीता नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
मोठी उमरी येथील पुरुषाचा मृत्यूकोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोला शहरातील मोठी उमरीतील विठ्ठल नगर भागातील एका ५० वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
५३ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, कोविड केअर सेंटर, बाशीर्टाकळी येथून पाच अशा एकूण ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.९७६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५५८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९७६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.