अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, २७ एप्रिल रोजी आणखी दहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६५५ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३४, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये १६६ अशा एकूण ५०० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३८,५४३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६१७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर तालुक्यातील ३२, अकोट तालुक्यातील ५४, बाळापूर तालुक्यातील २१, तेल्हारा तालुक्यातील तीन, बार्शी टाकळी तालुक्यातील सहा, पातूर तालुक्यातील चार आणि अकोला-२१४ (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१८९) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा मृत्यू
पारस येथील ५१ वर्षीय महिला
विझोरा ता. बार्शीटाकळी येथील ४० वर्षीय पुरुष
गिरी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष
मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुष
बाळापूर येथील ४४ वर्षीय पुरुष
वाशिम बायपास येथील ४५ वर्षीय पुरुष
अकोट फैल येथील ६१ वर्षीय पुरुष
व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष
हनुमान बस्ती येथील ६३ वर्षीय पुरुष
पातूर येथील ४० वर्षीय पुरुष
७५२ कोरोनामुक्त
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, मुलांचे वसतीगृह येथील १९, कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ६३० असे एकूण ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,३५३ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८,५४३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३२,५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.