अकोला : संपूर्ण अकोला जिल्ह्यावर कोरोनाचा पाश आणखीनच घट्ट झाला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमखी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २८ जून रोजी कोरोनामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. तब्बल ९० नवे रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ७७ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १५१० झाली आहे. दरम्यान, २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ३४५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे.सकाळी आलेल्या अहवालात पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, टेकडीपुरा अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शीटाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १२ अहवालात सहा महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सात जण तारफैल, चार जण लहान उमरी येथील व खदान येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.तीन जण दगावलेरविवारी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण २६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून, तो १४ रोजी दाखल झाला होता. त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी दुपारी बार्शीटाकळी येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.२८ जणांना डिस्चार्जआज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच तर कोविड केअर सेंटर मधून २३ अशा २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ज्या रुग्णांना आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. ते रुग्ण सिंधी कॅम्प, खैर मोहम्मद प्लॉट, महाकाली नगर, अकोट फैल व शंकरनगर येथील रहिवासी आहेत. कोविड केअर सेंटर मधून ज्या २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सिंधी कँप मधील सहा जण, खदान, अशोक नगर व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन जण व देशमुख फैल, शिवनी, शिवाजीनगर, लहुजी नगर, लाडिस फैल, हरिहर पेठ, शंकर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
३५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १५१० पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७७ जण (एक आत्महत्या व ७६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०७५ आहे. तर सद्यस्थितीत ३५८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.प्राप्त अहवाल-३४५पॉझिटीव्ह अहवाल-९०निगेटीव्ह-२५५आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५१०मयत-७७ (७७+१)डिस्चार्ज-१०७५दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५८