अकोला: अकोल्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, १८ जून रोजी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९६ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील चार जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज दोघा जणांचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ११०६ झाली आहे. आजअखेर ३२४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७७५८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७४३९, फेरतपासणीचे १३३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७७४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६६३५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ११०६ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. आज १४ पॉझिटिव्ह आज दिवसभरात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते शिवसेना वसाहत, शंकर नगर, चांदुर खडकी व खडकी येथील रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यातील चार जण बाळापूर येथील दोन जण हरिहरपेठ येथील तर उर्वरित गुलजारपुरा, त्रिमुर्तीभवन, जुने शहर. मोठी उमरी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दोघे मयत
दरम्यान, काल (दि.१७) रात्री उपचार घेताना दोघांचा मृत्यू झाला.त्यात कारंजा लाड जि. वाशीम येथील ५७ वर्षीय महिला असून ही महिला दि.१६ रोजी दाखल झाली होती,तिचा काल मृत्यू झाला. तर अन्य एक ७७ वर्षीय पुरुष असून ते हरिहर मंदिर जवळचे रहिवासी आहेत. ते दि.११ रोजी दाखल झाले त्यांचा काल(दि.१७) मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१७ जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला . त्यात १३ जणांना घरी सोडण्यात आले तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात १० पुरुष आणि सात महिला आहेत. त्यात खदान येथील तीन जण, बाळापूर येथील दोन जण, तर जठारपेठ, पोलीस क्वार्टर, सिंधी कॅम्प, माळीपुरा, सिव्हील लाईन, अकोटफैल, शिवाजीनगर, मुर्तिजापूर, जुने शहर, हमजा प्लॉट, गंगा नगर, देवी पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ११०६जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५८ जण (एक आत्महत्या व ५७ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७२४ आहे. तर सद्यस्थितीत ३२४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.