शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
4
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
5
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
6
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
7
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
8
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
9
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
10
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
11
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
12
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
13
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
14
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
15
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
16
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
17
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
18
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
19
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
20
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोन मृत्यू; १८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 7:06 PM

दोघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २० वर पोहचल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे२३२अहवालात २१४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. चिरानिया कंपाउंड परिसरातील एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.मंगळवारी सावंतवाडी, रणपीसे नगर येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोला : अकोला शहरात ठाण मांडून बसलेल्या कोरोना विषाणूचा प्रकोप थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १९ मे रोजी दिवसभरात दोन मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २७९ वर गेला आहे. दरम्यान, चिरानिया कंपाउंड परिसरातील एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचा कोरोना संसर्ग चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तर मंगळवारी सावंतवाडी, रणपीसे नगर येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २० वर पोहचल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर आजअखेर प्रत्यक्षात ११५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २८२६ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २७५४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २४७५ अहवाल निगेटीव्ह तर २७९ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ७२ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण २८२६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५८३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचा?्यांचे १३४ नमुने होते. आजपर्यंत एकूण २७५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५११ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचा?्यांचे १३४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २४७५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २७९ आहेत. तर आजअखेर ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.दिवसभरात १८ पॉझिटिव्हआज दिवसभरात प्राप्त झालेल्या २३२अहवालात २१४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या पॉझिटीव्ह अहवालांपैकी ११ पुरुष आणि सात महिला आहेत. तर त्यातील चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील तर अन्य सोनटक्के प्लॉट जुने शहर, सिंधी कॅम्प, मुजप्फरनगर लकडगंज, आंबेडकरनगर बसस्टँड मागे, फिरदौस कॉलनी, दगडी पूल, बैदपूरा, आदर्श कॉलनी सिंधी कॅम्प, अकोली बुद्रुक गीतानगर जुनेशहर, हाजीनगर अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट,मोमीनपुरा ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. तर चिराणीया कंपाऊंड, रामदास पेठ येथील व्यक्ती काल (दि.१८) मयत झाला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी कळविले आहे.

२३ जणांना डिस्चार्जदरम्यान काल (दि.१८) रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. हे सर्व जण संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील आठ जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरीत जुना आळशी प्लॉट, माळीपुरा, फिरदौस कॉलनी, गोकुळ कॉलनी, तारफैल, भीमनगर, सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल या भागातील रहिवासी आहेत. आता एकूण डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तिंची संख्या १४४ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.११५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत २७९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २० जण (एक आत्महत्या व १९ कोरोनामुळे) मयत आहेत. काल सोमवार दि.१८ रोजी २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४४ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या