अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर कमी होण्याची कोणतीच चिन्हे नसून, या आजाराला बळी पडणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सोमवार, १५ जून रोजी दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आणखी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५३ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०४१ झाली आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रविवार, १४ जूनला जिल्ह्यात कोरोनाबळींचे अर्धशतक गाठले, तर कोरोनाबाधितांच्या संख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ झाली होती. यामध्ये सोमवारी आणखी ३४ जणांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी एकूण १४३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३४ पॉझीटिव्ह, तर उर्वरित १०९ निगेटिव्ह आहेत. सकाळी शिवसेना वसाहत, तार फैल व शिवाजीनगर येथील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सायंकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले. त्यात १३ महिला तर १८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सिंधी कॅम्प येथील नऊ, बाळापूर येथील चार, चांदूर येथील तीन, खदान येथील दोन, जीएमसी होस्टेल येथील दोन, तर आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवाजी नगर, हिंगणा , रणपिसे नगर, रामदास पेठ, अकोट फैल, बार्शीटाकळी, शिवनी, अंबिकानगर, गंगानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आणखी दोन दगावलेसोमवारी दोघांच्या मृत्यू नोंद झाली. यापैकी शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. तर सोमवार दुपारी फिरदौस कॉलनी येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना २ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
आणखी २१ जणांना डिस्चार्जसोमवारी २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १६ जणांना घरी सोडण्यात आले. तर पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात नऊ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात खदान येथील चार, सिंधी कॅम्प येथील चार, रामदास पेठ येथील दोन तर विजय नगर, गुलजार पुरा, कौलखेड, सावकारनगर, भारती प्लॉट, शास्त्री नगर, सोनटक्के प्लॉट, कमला नेहरु नगर, कैलास टेकडी, जीएमसी क्वार्टर, नायगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत १०४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५३ जण (एक आत्महत्या व ५२ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ६५८ आहे. तर सद्यस्थितीत ३३० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त अहवाल-१४३पॉझिटीव्ह-३४निगेटीव्ह-१०९
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०४१मयत-५३(५२+१),डिस्चार्ज-६५८दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३०