अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर थांबण्याची चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, १२ जुलै रोजी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ९४ झाली आहे. तर एकूण बाधितांची संख्या १८७९ वर गेली. दरम्यान, रविवारी तब्बल ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात १३८ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ११८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील १३ जण अकोट येथील असून, दोन जण महान, दोन जण बाळापूर, तर उर्वरित सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही अहवाल आला नाही.
पुरुष व महिलेचा मृत्यूशहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ७८ वर्षीय पुरुषाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे. तर अकोट येथील ६० वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला २५जून रोजी दाखल झाली होती.४८ जणांना डिस्चार्जरविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, कोविड केअर सेंटर मधून ३०, आयकॉन हॉस्पिटल मधून पाच, ओझोन हॉस्पिटल मधून चार व हॉटेल रिजेन्सी येथून पाच अशा एकूण ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत २७३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८५८+२१= १८७९मयत-९४(९३+१)डिस्चार्ज- १५१२दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २७३