अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी रात्री कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण दाखल झाले. हे दोन्ही संशयित रुग्ण मुर्तिजापूर येथील रहिवासी असून, त्यांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. तर अतिदक्षता कक्षात दाखल एकाचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र, बुलडाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने ‘सोशल डिस्टंसिंग’ राखण्याची गरज निर्माण झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील २८ जणांचे वैद्यकीय चाचणी नमुने निगेटीव्ह आले आहेत. राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत अकोल्यात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने अकोलेकरांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. परंतु, दररोज दाखल होणाऱ्या कोरोनाच्या संशयित रुग्णांमुळे चिंता अजूनही कायम आहे. अशातच शनिवारी रात्री बुलडाणा जिल्ह्यातील एक ा रुग्णाचा आयसोलेशन कक्षात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून रविवारी त्या रुग्णाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आली. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग राखण्याची गरज निर्माण झाली आहे.
CoronaVirus In Akola : आणखी दोन संशयित दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 5:27 PM