अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्रही कायम आहे. शनिवार, १३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे. तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७८ झाली आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख प्राप्त झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी ६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत, तर उर्वरित ६२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. ते रजपुतपुरा, बलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेड, हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत.दोघांचा मृत्यूदरम्यान, शनिवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही मयत महिला आहेत. त्यापैकी एक ५२ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून, १० जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. जुने शहरातील देशपांडे प्लॉट भागातील ८० वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. सदर महिलेस ८ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.प्राप्त अहवाल-६७पॉझिटीव्ह- ०५निगेटीव्ह-६२आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ९७८मयत-४६(४५+१),डिस्चार्ज- ६०६दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२६
Coronavirus in Akola: कोरोनाचे आणखी दोन बळी; पाच नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ४६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:24 AM
शनिवार, १३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
ठळक मुद्देयामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे.तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७८ झाली आहे.शनिवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.