अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी, मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. रविवार २५ आॅक्टोबर व सोमवार २६ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७२ झाली आहे. या दोन दिवसांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१ व रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे एकूण २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२६७ झाली आहे. दरम्यान, रविवारी आणखी १३ जणांनी कोरोनावर मात केली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवार सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सुंदर नगर येथील तीन, रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी दोन जण, राऊतवाडी, सी. ओ. कॉलनी, मुकुंद नगर, राजंदा, गोरक्षण रोड, वरखेड बाशीर्टाकळी, आर. एस. हॉटेल रेल्वे स्टेशन, जुने शहर, डाबकी रोड, न्यू महसूल कॉलनी, आदर्श नगर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.अकोट, भेंडी महाल येथील रुग्णांचा मृत्यूसोमवारी बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी महाल येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. सोमवारी अकोट येथील दखनी फाईल भागातील ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २२ व २१ आॅक्टोबर रोजी उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.५०८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,४८७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५०८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
CoronaVirus in Akola : दोन दिवसांत दोघांचा मृत्यू; २२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 11:53 AM