अकोला : कोरोनाचा कहर थांबण्याची काहीच चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर २५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०२ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४३८ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ३०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २८२ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये १४ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चार जण हे तेल्हारा तालुक्यातील राणेगाव, चार जण हिवरखेड, चार जण पळसो-बढे, तीन जण बोरगाव मंजू, दोन जण अकोला शहरातील खदान भागातील, दोन जण नित्यानंद नगर, दोन जण जुने शहरातील, तर उर्वरित प्रत्येकी एक जण शिवणी, शंकरनगर, तारफैल व निपाना-कोठारी येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.४० वर्षीय महिला दगावलीकोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, रविवार, २६ जुलै रोजी रात्री उशिरा एका ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट भागातील असून, त्यांना १८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.३५६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत २४३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १९८० जणांनी कारोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- ३०७पॉझिटीव्ह- २५निगेटीव्ह- २८२एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१७७+२६१=२४३८मयत-१०२,डिस्चार्ज- १९८०दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५६