अकोला : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या अकोला शहरात गुरुवार, २८ मे रोजी आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण आकडा ५०८ वर गेला. दरम्यान, गुरुवारी तब्बल १०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने किंचित दिलासाही मिळाला आहे. सद्यस्थितीत १६५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून गुरुवारी सकाळी ११० संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सोनटक्के प्लॉटस्थित ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित १०९ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरुवारी एका रुग्णाची भर पडल्याने आता जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५०८ झाली आहे. आतापर्यंत ३१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २८ कोरोनाबाधितांचा मृत्यू (एक आत्महत्या )झाला आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात १६५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल- ११०पॉझिटीव्ह- ०१निगेटीव्ह- १०९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ५०८मयत-२८(२७+१),डिस्चार्ज- ३१५दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १६५
CoronaVirus : अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह; १०९ संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:55 AM
गुरुवार, २८ मे रोजी आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण आकडा ५०८ वर गेला.
ठळक मुद्देसोनटक्के प्लॉटस्थित ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.१०९ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.