अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण संक्रमित होत आहेत. कोरोनाच्या बळींची संख्याही वाढत असून, सोमवार, १५ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ५२ झाली आहे. तर आणखी तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्याही १०१० झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ६३७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३२१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रविवार, १४ जूनला जिल्ह्यात कोरोनाबळींची अर्धशतक गाठले, तर कोरोनाबाधितांच्या संख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ झाली होती. यामध्ये सोमवारी आणखी तिघांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी एकूण ७७ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तीन पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७४ निगेटिव्ह आहेत. आज प्राप्त अहवालात तीनही रुग्ण पुरुष असून ते शिवसेना वसाहत, तार फैल व शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.दरम्यान, सोमवारी एकाच्या मृत्यू नोंद झाली. मयत हा शिवाजीनगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून , त्यांना १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. शनिवार १३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचाअहवाल सोमवारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आजच्या अहवालात या रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.प्राप्त अहवाल-७७पॉझिटीव्ह-तीननिगेटीव्ह-७४आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०१०मयत-५२(५१+१),डिस्चार्ज-६३७दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२१
CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ५२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:03 AM
आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ५२ झाली आहे.
ठळक मुद्देआणखी तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. एकूण बाधितांची संख्याही १०१० झाली आहे. ३२१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु.