शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ४१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:35 AM

बुधवार, १० मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या ४१ झाली आहे.

ठळक मुद्देगाडगेनगर- हरीहरपेठ भागातील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.१४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही भर पडली नाही.

अकोला :  अकोल्यात बस्तान मांडून बसलेल्या कोरोनाने आता चांगलाच धुमाकूळ घातला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाºयांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १० मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाºयांची संख्या ४१ झाली आहे.  बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही भर पडली नाही ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. दरम्यान,बुधवारी १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत २६४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत ४१ जण या आजाराला बळी पडले आहेत. बुधवारी गाडगेनगर- हरीहरपेठ भागातील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीला ६ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी एकूण २६ अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.  

आणखी १४ जणांना डिस्चार्जएकीकडे कोरोनाची बाधा होणाºयांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे या संसर्गजन्य आजारावर मात करणाºयांचा आकडाही वाढत आहे. बुधवारी सकाळी १४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. त्यातील तिघे सिव्हिल लाईन येथील, तिघे हरिहरपेठ येथील, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरित हिंगणारोड, आंबेडकर नगर, गुरुनानक नगर, गायत्री नगर, सिटी कोतवाली व माळीपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत  ५५९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्या २६४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे  जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

प्राप्त अहवाल-२६पॉझिटीव्ह-शून्यनिगेटीव्ह-२६

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ८६४मयत-४१ (४०+१),डिस्चार्ज- ५५९दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- २६४ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला