अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाला आॅक्टोबर महिन्यात ‘ब्रेक’ लागला आहे. सोमवार, ५ आॅक्टाबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये केवळ तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या ७,६४४ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये तिन्ही पुरुष असून, ते रामदास पेठ, जयहिंद चौक, देवराव बाबा चाळ भागातील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.८८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६४४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६५१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
CoronaVirus : अकोल्यात रुग्णवाढीला ब्रेक; केवळ तीन नवे रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:22 IST