शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
2
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
3
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
4
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
5
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
6
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
7
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
8
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
9
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं
10
"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर!
11
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
12
एका धावेत गमावले तब्बल ८ बळी! ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत झाला अजब खेळ
13
पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर
14
Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...
15
मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण
16
Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित
17
मोठी घडामोड! अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; मध्यरात्री दोन तास चर्चा
18
Ashish Shelar : "आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं"
19
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
20
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!

CoronaVirus : मनपाच्या भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:54 AM

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत येणारा बैदपुरा परिसर कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ...

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत येणारा बैदपुरा परिसर कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ताटकळत बसावे लागत असल्याची सबब पुढे करीत या भागातील नागरिकांनी आरोग्य तपासणीकडे पाठ फिरविल्याची बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात संशयितांचे नमुने घेण्याची व्यवस्था केली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजतापर्यंत या ठिकाणी केवळ सहा जण दाखल झाले होते. दुपारी ३ वाजतापर्यंत तब्बल ७० जणांनी त्यांचे नमुने वैद्यकीय यंत्रणेला दिले. त्यानंतर यामध्ये चांगलीच वाढ झाली.महापालिका क्षेत्रात बैदपुरा, ताजनापेठ, मोहम्मद अली रोड, मोमीनपुरा, फतेह अली चौक आदी परिसरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.या परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांचे कुटुंबीय व त्यांचे निकटवर्तीय यांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्या जात आहे.यावेळी रुग्णालयात नमुने देण्यासाठी अनेक तास ताटकळत बसावे लागत असल्याची सबब पुढे करीत संबंधित संशयित रुग्णांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे पाठ फिरविल्याची बाब मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे नमुने घेण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी टिळक रोडवरील मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात व्यवस्था उपलब्ध केली. मंगळवारी संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी प्रारंभ करण्यात आला.नमुने देणारे ‘होम क्वारंटीन’मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात प्रतिबंधित क्षेत्रातील संशयित नागरिकांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत संशयित नागरिकांना ‘होम क्वारंटीन’ होण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. ज्या नागरिकांच्या घरी अपुरी जागा आहे, त्यांना रामदासपेठ पोलीस स्टेशनलगतच्या आबासाहेब खेडकर सभागृहात पाठविण्यात आले आहे.‘जीएमसी’च्या या चमूने घेतले नमुनेकोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी संशयितांचे नमुने घेण्यासाठी भरतीया रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने डॉ. फराह जीकारे, डॉ. गणेश पारणे, डॉ. पूजा कोहर, डॉ. विद्या डोले ही चमू दाखल झाली होती. त्यांच्या मदतीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतील डॉ. भास्कर सगणे, डॉ. अशोक पातोर्ढे, डॉ. सुरेश ढोरे, डॉ. प्रियेश शर्मा, डॉ. रचना सावळे, डॉ. प्रज्ञा खंडेराव, डॉ. नंदकिशोर हागे, डॉ. आसिफ इक्बाल, अनिस अहमद ही चमू कार्यरत आहे.सुमारे अडीच तास कोणीही फिरकले नाही!प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात मनपाची वैद्यकीय यंत्रणा सकाळी ९ वाजतापासून सज्ज होती. सुमारे अडीच तासपर्यंत या ठिकाणी नमुने देण्यासाठी कोणीही नागरिक फिरकले नाहीत. ११.३० वाजतापर्यंत सहा नागरिक या ठिकाणी दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले.आयुक्त म्हणाले, घाबरू नका, मीसुद्धा इथेच थांबतो!भरतीया रुग्णालयात नमुने देण्यासाठी दाखल होणाºया नागरिकांच्या चेहºयावर चिंता दिसून येत होती. हे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घाबरू नका, मीसुद्धा इथेच थांबतो, असे सांगत संबंधितांना दिलासा दिला. यावेळी उपायुक्त रंजना गगे, वैभव आवारे, सहायक आयुक्त पूनम कळंबे, कार्यकारी अभियंता अजय गुजर, कर अधीक्षक विजय पारतवार, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते उपस्थित होते.मनपाकडून मूलभूत सुविधांची पूर्तताभरतीया रुग्णालयात नमुने देण्यासाठी उपस्थित झालेल्या नागरिकांकरिता मनपाने बसण्यासाठी खुर्च्या व पिण्यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. तपासणीला जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर जंतुनाशक फवारणी केली जात होती.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या