अकोला : कोरोना संसर्गाचा विदर्भातील हॉटस्पाट म्हणून उदयास आलेल्या अकोला जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, २९ एप्रिल रोजी यामध्ये आठ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी आणखी आठ नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५२४ झाली आहे. यापैकी २९ रुग्णांचा मृत्यू, तर ३४९ रुग्ण बरे झाल्याने आता १४६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सकाळी दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अकोल्यात असून, कोरानाचे सर्वाधिक बळीही अकोल्याच गेले आहेत. गुरुवार, २८ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५१६ होता. यामध्ये शुक्रवारी आठ रुग्णांची भर पडत हा आकडा ५२४ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शुक्रवारी १५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.तेल्हारा तालुक्यात आणखी दोन रुग्णसंपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना तेल्हारा तालुका मात्र अलिप्त राहिला होता. गत आठवड्यात पाच रुग्ण आढळून आले होते. ते बरे झाल्यानंतर तालुका कोरोनामुक्त झाला होता. आता तेल्हारा शहर व बेलखेड येथे प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळून आले आहेत.समुह संक्रमणाचा धोका वाढलाजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अकोला शहरात तर सर्वच प्रभागांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे अकोलेकरांनी खबरदारी राखण्याची गरज आहे.प्राप्त अहवाल-१५७पॉझिटीव्ह-आठनिगेटीव्ह-१४९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-५२४मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३४९दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४६
CoronaVirus : अकोल्यात आणखी आठ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ५२४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:11 PM
शुक्रवार, २९ एप्रिल रोजी यामध्ये आठ नव्या रुग्णांची भर पडली.
ठळक मुद्देशुक्रवारी आठ रुग्णांची भर पडत हा आकडा ५२४ वर गेला आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत.