लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कंटेनमेन्ट झोन वगळता जिल्हा प्रशासनाने सुमारे १० हजार नागरिकांची चक्क दुसºयादा आरोग्य तपासणी केली असता कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यामुळे जिल्हा प्रशासनासह मनपा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यासह शहरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे चित्र आहे. आजरोजी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी १९०० च्या वर आकडा गाठल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सद्यस्थितीत शहराच्या कानाकोपºयात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरवासीयांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने संपूर्ण अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे १ हजार कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. यादरम्यान, शहरातील कंटेनमेन्ट झोन वगळून जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या मार्गदर्शनात ४२६ पथकांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्रारंभ केला. सदर पथकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल तयार करून तो महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे सादर केला होता.
अर्जांची केली छाननी!जिल्हा आरोग्य यंत्रणेने शहरातील कंटेनमेन्ट झोन वगळून इतर भागात नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीदरम्यान लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंतची नोंद अर्जामध्ये घेण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीचे वय तसेच त्यांना कोणकोणते आजार आहेत, त्याची सविस्तर माहिती अर्जात नमूद करण्यात आली. सदर अर्जाचे गठ्ठे मनपाच्या आरोग्य यंत्रणेकडे सादर केल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येऊन छाननी करण्यात आली.
मनपाच्या छाननीमध्ये २७०० जणांना आजारनागरिकांची तपासणी करताना आॅक्सिमीटरचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये शरिरात आॅक्सिजनची (प्राणवायू) मात्रा किती असावी, याचा उल्लेख आहे. या सर्व अर्जांची छाननी करून त्यामध्ये गंभीर व किरकोळ स्वरूपाचे आजार असलेल्या सुमारे २ हजार ७०० नागरिकांची वेगळी यादी तयार करून ती मनपाच्या चारही क्षेत्रीय कार्यालयांकडे सादर करण्यात आली होती. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आदी आजारी व्यक्तींचा समावेश आहे.
पुन्हा केली तपासणीउपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या पथकांनी शहरातील १० हजार नागरिकांची नव्याने आरोग्य तपासणी केल्याची माहिती आहे. तपासणीदरम्यान कोरोनाची लक्षणे किंवा कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्यामुळे ही बाब प्रशासनासाठी दिलासादायक मानली जात आहे.