शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

Coronavirus: चांदुरात वऱ्हाडींना रोखले; शेतात भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 2:10 PM

काही मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना व्हायरसचे संक्रमण होउ नये यासासाठी राज्यभरात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. शहरी भागात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मात्र मुळ अकोला शहरातील एका जोडप्याचा विवाह चांदूर येथे आयोजित करण्यात आला होता. याविषयी ग्रामस्थांना माहिती मिळताच वऱ्हाडींना गावाबाहेर थांबवण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या मदतीने या वºहाडींना गावात प्रवेश नाकारण्यात आला. काही मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आले. तसेच वऱ्हाडींसाठी गावाबाहेर असलेल्या एका शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची सक्तीने अंमलजावणी करण्यात येत आहे.पुणे शहरात कामानिमित्त वास्तव्यास असलेला वर व मुंबई येथे कार्यरत असलेली वधू या जोडप्याचा विवाह चांदूर येथील एका नातेवाइकाकडे आयोजित करण्यात आला होता. १९ मार्च रोजी हा विवाह होणार होता. याविषयी माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासन तथा ग्रामस्थांनी याविषयी प्रशासनाला माहिती दिली. तसेच पोलिसांनाही माहिती देऊन वºहाड्यांना गावात प्रवेश देऊ नये अशी मागणी केली. त्यामुळे लग्न लावण्यासाठी गुरुवारी चांदुरात दाखल झालेल्या वºहाड्यांना पोलिसांनी गावाबाहेरच रोखले. तसेच त्यांना परत जाण्याचा आदेश दिला. काही मोजक्या वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. वºहाडासाठी गावाच्या बाहेर असलेल्या एका शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती; मात्र त्यातील अनेक वºहाडींनी आपआपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस