अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बसस्थानक व लक्झरी बसस्थानक येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके कार्यान्वित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार १२ वैद्यकीय अधिकाºयांची पथके गठित करण्यात आली आहेत.जिल्ह्याबाहेरून अकोला शहर व जिल्ह्यात येणाºया व्यक्तींपैकी ज्यांना सर्दी, खोकला, ताप आदी प्रकारच्या आजारांचा त्रास आहे, अशा व्यक्तींची रेल्वे स्थानक, बसस्थानक लक्झरी बसस्थानक येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांची पथके कार्यान्वित करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सकांसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांना २० मार्च रोजी दिला. त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बसस्थानक व लक्झरी बसस्थानक येथे जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी १२ वैद्यकीय अधिकाºयांची पथके गठित करण्यात आली आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.