अकोला : नागपूर येथून अकोल्यात आलेल्या दोघांना कोरोना संशयीत म्हणून आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. हे दोन व्यक्ती मंगळवारी दुपारी अकोल्यात आल्यानंतर त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले असून, त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. या दोघांची वैद्यकीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.विमानतळावरील स्क्रिनिंगनंतरही द्या माहितीविमानाने प्रवास करून येणाऱ्यांनी प्राथमिक माहिती तातडीने सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना व्हायरस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे. या पर्यटकांचे विमानतळावर स्क्रिनिंग होत आहे; मात्र तरीही त्यांनी विदेशातून प्रवास केल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालयात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.तर कुटुंबीय धोक्यात?विदेशातून येत असलेले पर्यटक माहिती दडवित असल्याने त्यांचे कुटुंबीयही धोक्यात आणत आहेत. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने सामाजिक जागरुकतेचे भान राखत अकोल्यात दाखल होताच त्याची प्रथम माहिती कोरोना व्हायरस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.