लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील २० अहवाल व्हीआरडीएल लॅबमधील, तर २४ अहवाल रॅपिड अॅन्टिजन टेस्टमधील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.सप्टेंबर महिन्यात तब्बल ३ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ८० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गुरुवारीदेखील सुरूच होते. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये अंबिका नगर येथील ६८ वर्षीय पुरुष असून, तो १८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. तापडिया नगर येथील ७३ वर्षीय रुग्ण २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता, तर आदर्श कॉलनी येथील ७५ वर्षीय रुग्ण २६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता.या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्हीआरडीएल लॅबमधून प्राप्त २० पॉझिटिव्ह अहवालामध्ये अकोट येथील तीन जण, बोर्डी (ता. अकोट) येथील दोन जण, तर उर्वरित केशवनगर, मोठी उमरी, शाहापूर, गीतानगर, कैलासनगर, कीर्ती नगर, जीएमसी, जुने शहर, चिखलगाव, पातूर, राधाकिशन प्लॉट व बार्शीटाकळी, राजाराम नगर कौलखेड, देवी खदान व गीता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात १,२७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
१६१ जणांना डिस्चार्जगुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १८ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ११ जण, खासगी रुग्णालयातून ४, होम क्वारंटीनचा कालावधी पूर्ण झालेले १२८, अशा एकूण १६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.