अकोला: अकोल्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १९ जून रोजी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्याही ११३६ झाली आहे. दरम्यान, आज दुपारी आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे ३३५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णआढळून येत असून, कोरोनाच्या बळींचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११०६ होती. शुक्रवारी यामध्ये ३० रुग्णांची भर पडत हा आकडा ११३६ झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात एकून २७७ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळच्या १५ पॉझिटिव्ह अहवालात आठ महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये अकोटफैल येथील पाच, बाळापूर येथील चार, तर जेतवन नगर,कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर,मोठी उमरी ,बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील अकोट फैल येथील तिन, सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, अकोट, बाळापूर, हरिहर पेठ, आंबेडकर चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.८२ वर्षीय वृद्धाचा मृत्यूगुरुवारी रात्री उपचार घेताना एका ८२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. सद व्यक्ती हरीहरपेठ, अकोला येथील असून, त्यांना गुरुवारीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ झाला आहे.आणखी १८ जणांना डिस्चार्जआज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील ११ जणांना घरी तर सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ३३५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल- २७७पॉझिटीव्ह-३०निगेटीव्ह-२४७आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-११३६मयत-५९ (५८+१), डिस्चार्ज- ७४२दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३५