अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ०१ जुलै रोजी कोरोनाची बाधा झालेले आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५६१ वर गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेकोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून १२१ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ११० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.सकाळी प्राप्त ११ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तीन महिला व आठ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये चार जण अकोट येथील, दोन जण गवळीपूरा अकोला, तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, जेल क्वार्टर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत ७९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ११४५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या ३३७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल-१२१पॉझिटीव्ह अहवाल-११निगेटीव्ह-११०
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५६१मयत-७९ (७८+१)डिस्चार्ज-११४५दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३७