शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus : ‘त्या’ रुग्णावर झाली होती नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:03 AM

दीड महिना उलटून गेल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने मनपा प्रशासन चक्रावून गेले आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यातील दुसºया आठवड्यात नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ‘हिस्ट्री’ शोधण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:सिंधी कॅम्पमधील पक्की खोली परिसरातील किराणा व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली कशी, हा व्यक्ती नेमका कोणाकोणाच्या संपर्कात आला होता, याची ‘हिस्ट्री’ शोधण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.सदर व्यक्ती फेब्रुवारी महिन्यात गोवा येथे गेल्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे दीड महिना उलटून गेल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने मनपा प्रशासन चक्रावून गेले आहे.शहरातील सिंधी कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू व्यावसायिक राहतात. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाचे जीएमडी मार्केटमध्ये मोठे किराणा दुकान असून, या ठिकाणी फळांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. याव्यतिरिक्त लहान मुलांच्या खेळण्यांचीही विक्री होते. या भागातील रामनगर, तोष्णीवाल ले-आउट, जवाहर नगर, शास्त्री नगर, सुधीर कॉलनी आदी भागातील रहिवाशांकडून याच दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे मागील आठ-दहा दिवसांमध्ये या किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणाऱ्यांची संख्या नेमकी किती आहे, याचा शोध मनपाच्या स्तरावर घेतला जात आहे. त्या पृष्ठभूमीवर संबंधित भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मनपाकडून विचारपूस करण्याचे काम सुरू झाले आहे.नागपूर महापालिकेसोबत संपर्ककोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णावर मार्च महिन्यातील दुसºया आठवड्यात नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याची माहिती घेतल्यानंतर रविवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर महापालिकेसोबत संपर्क साधून या विषयावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.दुकानातून साहित्य घेणारे ‘लो रिस्क’मध्येगत १५ ते २० दिवसांच्या कालावधीमध्ये संबंधित व्यावसायिकाच्या किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ व लहान मुलांची खेळणी खरेदी करणाºया सर्व ग्राहकांचा समावेश ‘लो रिस्क’मध्ये होतो. अशा संबंधित ग्राहकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

किराणा दुकानातील पाच जण ‘आयसोलेशन’ कक्षातसंबंधित व्यावसायिकाच्या किराणा दुकानात काम करणारे पाच कर्मचारी तसेच कुटुंबातील काही व्यक्तींसह संपर्कात आलेले तीन डॉक्टर अशा एकूण २८ जणांना उपचारासाठी ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.गत आठ-दहा दिवसांत संबंधित व्यक्तीच्या किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणाºया नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, नाकातून पाणी येणे अशी किरकोळ लक्षणे आढळून आल्यास महापालिका किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

कोरोनाची लागण नेमकी झाली कोठे?सिंधी कॅम्पमधील व्यावसायिकावर झालेल्या शस्त्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता दीड महिन्यानंतर या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. या प्रकारामुळे दुकानात साहित्य खरेदीसाठी आलेला एखादा व्यक्ती कोरोनाचा ‘कॅरियर’ (वाहक) होता का, याकडेही मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या