- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात मुंबई, पुणे व ठाणेनंतर आता अकोल्यातही कोविड पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यात नागपूर आणि विदर्भातील उर्वरित भागांमध्ये दररोज शेकडो नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे; मात्र अकोला जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढूनही पॉझिटिव्ह येणाºया रुग्णांच्या संख्यात लक्षणीय घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.विदर्भात मे, जून महिन्यात अकोला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. या दोन महिन्यात अकोला जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढीचा दर विदर्भात सर्वाधिक होता. शिवाय, मृत्युदरही जास्त होता. नागपूर, अमरावतीसारख्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने रुग्णसंख्या वाढीचा वेग आणि मृृत्युदरही कमी होता. जून महिन्यात कोविड रुग्णसंख्या वाढ १८ टक्क्यांपर्यंत होती. जुलै महिन्यात जिल्ह्यात रॅपिड अॅन्टिजन टेस्ट सुरू करण्यात आल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.याच दरम्यान राज्यातील महानगरपालिका असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अकोल्याचा रुग्ण दुपटीचा दर वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवालांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गत चार महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात तुलनेने जास्त चाचण्या झाल्या असून, रुग्णवाढीचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे.
रुग्णवाढीचा दर ४.९९ टक्क्यांवरगत २१ दिवसात जिल्ह्यात ८,८४६ चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यापैकी ४२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ मागील २१ दिवसांत जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर ४.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तुलनेने इतर जिल्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.
असा आहे अकोला पॅटर्न!जिल्ह्यात एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यात युद्धपातळीवर आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅन्टिजन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या. यामध्ये प्रामुख्याने पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क रुग्ण, लो रिस्क असलेले लक्षणे असलेले रुग्ण तसेच ६० वर्षांवरील रुग्णांची यादी करून त्यांच्या चाचण्या केल्या. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत झाली.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्ह्यात ‘ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटमेंट’ हा ‘थ्री-टी’ फॉर्म्युला वापरण्यात आला. त्यामुळेच कोविडचा संभाव्य फैलाव रोखण्यात यश मिळाले.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला