शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Coronavirus : खासगी रुग्णालयातील कम्पाउंडर दोन वेळा निगेटिव्ह, तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:13 AM

हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होताच अत्यंत गरीब कुटुंबातील या युवकाला मानसिक धक्का बसला आहे.

अकोला: जुने शहरातील जय हिंद चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात कंम्पाउंडर म्हणून कार्यरत असणाºया एका १९ वर्षीय युवकाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत तीन वेळा घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असता पहिल्या दोन अहवालामध्ये हा रुग्ण निगेटिव्ह असल्याचे समोर आले होते. तिसºया चाचणीमध्ये मात्र हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होताच अत्यंत गरीब कुटुंबातील या युवकाला मानसिक धक्का बसला आहे. या युवकावर सर्वोपचारमध्ये उपचार सुरू आहेत.कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये अनेकदा बदल होत असल्यामुळे त्यावर देशभरातीलच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञांकडून बारकाईने अभ्यास केला जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती आणि उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तरीही असे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत लवकरच ठणठणीत होत असल्याचेही समोर आले आहे. त्यापूर्वी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतल्यानंतर वैद्यकीय आरोग्य प्रशासनाच्या तपासणीत अचूक लक्षणे दिसून येत नसल्याची स्थिती आहे. अर्थात नमुने घेतल्यानंतर केल्या जाणाºया तपासणीमध्ये कोणतीही त्रुटी नसली तरीही कोरोना विषाणूच्या मूळ लक्षणांचा थांगपत्ता लागत नसल्याची स्थिती आहे. असाच काहीसा प्रकार जुने शहरातील जय हिंद चौक परिसरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाºया अत्यंत गरीब कुटुंबातील १९ वर्षीय युवकासोबत घडला. जयहिंद चौकातील या रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या अधिनस्त इतर पाच कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत १९ वर्षीय युवकाच्या घशातील स्रावाचे नमुने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने घेतले होते. पहिल्या चाचणीमध्ये या युवकाचा अहवाल निगेटिव्ह आला. तरीही रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टरांना संशय आल्यामुळे अतिशय सुदृढ दिसणाºया या युवकाचे पुन्हा दुसºयांदा नमुने घेतले. चाचणी केली असता, दुसराही अहवाल निगेटिव्ह आला. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे या युवकाने सुटकेचा निश्वास सोडला होता; परंतु या हॉस्पिटलमधून कोरोना विषाणूचा झालेला संसर्ग लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने या युवकाचे तिसºयांदा नमुने घेऊन त्याची चाचणी केली असता तिसºया अहवालात मात्र हा युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या