शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

CoronaVirus : कोरोनातून बरे झाल्यानंतरही ‘फायब्रोसीस’चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 10:32 AM

Akola News, CoronaVirus, Fibrosis १० ते २० टक्के रुग्णांना या आजाराला नव्याने सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लक्षणे नसली, तरी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रामुख्याने फुफ्फुसाचे इन्फेक्शन आढळून येते. यांसह इतरही आजारांची लक्षणं दिसून येतात. यावर मात करून अनेक रुग्ण बरे झालेले आहेत; मात्र त्यानंतरही त्यांच्यामध्ये ‘फायब्रोसीस’ म्हणजेच फुफ्फुसाचे इन्फेक्शन पुन्हा आढळून येण्याची शक्यता आहे. म्हणूनच कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांपैकी १० ते २० टक्के रुग्णांना या आजाराला नव्याने सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला न्यूमोनिया झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये फायब्रोसीसचा त्रास सुरू झाल्याचे आढळून येत आहे. या रुग्णांच्या रक्तामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. फुफ्फुसामध्ये आॅक्सिजन आणि कार्बनडाय आॅक्साईड यांच्या आवागमनाची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये त्रास व्हायला लागतो.या रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोरोना काळात न्यूमोनिया असलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या उतींना क्षति पोहोचते. त्या ठिकाणी जाड व कठीण उतींमुळे फुफ्फुसांचे कार्य मंदावते. या काळात कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, नैराश्य यांसह काही लक्षणे व्यक्तीनुसार बदलत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

काय करावे

  1. पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  2. ताप येणे, हगवण लागणे, कोरडा खोकला, तोंडाची चव जाणे या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.
  3. पहिल्या पाच दिवसात ही लक्षणे आढळतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
  4.  

दीड महिन्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची शक्यताकोरोना होऊन गेल्यामुळे रुग्णांमध्ये अ‍ॅन्टीबॉडिज तयार होतात. त्यामुळे कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला साधारणत: सहा आठवडे म्हणजेच दीड महिना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नसते; पण त्यानंतर पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. जे गंभीर रुग्ण आहेत, अशांमध्ये हृदय, किडनी व लिव्हरच्या आजारांची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना होऊन गेल्यावर साधारणत: दीड महिना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नसते. त्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसताच पहिल्या पाच दिवसांमध्ये उपचार घेण्यास सुरुवात करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त आहे.- डॉ. सागर थोटे, फुफ्फुसविकार तज्ज्ञ,अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला