शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

 Coronavirus : अकोल्यात सात जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 3:13 PM

पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त घोषित करून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देगुरुवारी सुटी देण्यात आलेले सर्व सातही रुग्ण पातूर येथील आहेत. सातही रुग्णांना त्यांच्या घरातच ‘क्वारंटिन’ ठेवण्यात येणार आहे.

अकोला : एकापाठोपाठ एक कोरोनाचे १६ रूग्ण आढळून आल्यानंतर अकोला शहर व जिल्हा कोरोचा हॉटस्पॉट बनतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली असताना, गत चार दिवसांपासून अकोलेकरांना सुखद बातम्या मिळत आहेत. गत तीन दिवसांत ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गुरुवारी पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त घोषित करून त्यांना सर्व वैद्यकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली.  दरम्यान, फेरतपासणीमध्ये चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढविली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १६ होती. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता,तर एका रुग्णाने आत्महत्या केली होती. 

गुरुवारी सुटी देण्यात आलेले सर्व सातही रुग्ण पातूर येथील आहेत. त्यांच्या तिसऱ्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना बुधवारी कोरोनामुक्त घोषित करण्यात येईल अशी अपेक्षा असताना, काही वैद्यकीय सोपस्कार बाकी असल्यामुळे त्यांना गुरुवारी कोरोनामुक्त घोषित करण्यात येऊन सुटी देण्यात आली. आता या सातही रुग्णांना त्यांच्या घरातच ‘क्वारंटिन’ ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.या रुग्णांना सुटी देण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,   प्रा. संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

चार रूग्णांचे फेरतपासणीचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

चार रूग्णांचे फेरतपासणीचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. हे चारही रुग्ण अकोल्यताली अकोटफैल, बैदपुरा परिसरातील रहिवासी आहेत. यासह मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या १४ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी आणि बैदपुरा परिसरातील रहिवासी तीन वर्षीय चिमुकल्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील सात रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला