अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, २९ आॅगस्ट रोजी अकोला शहर, अकोट व बाळापूर येथील तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५१ वर गेला आहे. दिवसभरात ६१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,८३६ वर पोहचली आहे. दरम्यान, शनिवारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात ३३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरत ३०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये काटखेड ता. बार्शीटाकळी येथील दोन, झोडगा ता. बार्शीटाकळी येथील दोन, मनब्दा ता. तेल्हारा येथील दोन, निंभा ता. मुर्तिजापूर येथील दोन, व्याळा येथील दोन, जीएमसी येथील दोन, निमवाडी येथील दोन, गणेश नगर येथील दोन, तर शास्त्री नगर, काटेपूर्णा ता. अकोला, महसूल कॉलनी, सिंधी कॉलनी, जवाहरनगर, जठारपेठ, डाबकी रोड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, हातरुन ता. बाळापूर, पळसो ता. अकोला, नायगाव, कान्हेरी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एक महिला, दोन पुरुषांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा शनिवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २५ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. दुपारी बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना २० आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. ओझोन या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रामदास पेठ भागातील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.खासगी प्रयोगशाळेचे ३२ अहवाल पॉझिटिव्हडॉ. हेडगेवार हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी नागपूर येथील खासगी प्र्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.२६ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून १० जण, अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.५४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,८३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३१४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.