अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ३० जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर दिवसभरात १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ७९ वर गेला असून, एकूण रुग्ण संख्या १५५० झाली आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल ५२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण २६२ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.सकाळी प्राप्त नऊ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. यापैकी दोघे जण बाळापूर येथील तर दोघे अकोट येथील आहेत. तसेच चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वर, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुष आहेत. ते मोठी उमरी, शिवहरा पेठ जुने शहर, डाबकी रोड, बाळापूर व मालेगाव जि. वाशीम येथील रहिवासी आहेत.दोघांचा सोमवारी रात्री मृत्यूकोरोनामुळे दगावणाºयांची संख्याही वाढत आहे. सोमवारी रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक अकोला शहरातील गंगानगर भागातील ७४ वर्षीय महिला असून, त्यांना १४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक जण अकोट येथील ५६ वर्षीय पुरुष असून, त्यांना २७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचाही सोमवारी रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.५२ जणांना डिस्चार्जमंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ तर कोविड केअर सेंटर मधून २४ अशा ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आलेल्या २८ जणांपैकी शंकरनगर येथील तीन जण, गुलजार पुरा व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित शिवनी, लाडिस फैल, कळंबेश्वर, दुर्गानगर, हरिहरपेठ, फिरदौस कॉलनी, खडकी, चांदूर खडकी, शिवसेना वसाहत, कौलखेड, अकोट, कमला नेहरू नगर, जीएमसी, लक्ष्मी कॉलनी, अनिकट पोलीस लाईन, बार्शीटाकळी, गीतानगर, तारफैल, अकोट फैल, राजीव गांधी नगर, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर २४ जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात बाळापूर येथील सहा, अशोक नगर व पातूर येथील प्रत्येकी तीन जण, शंकरनगर, गंगानगर, अकोट फैल, जुने शहर व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शिवनी व हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.३२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १५५० पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७९ जण (एक आत्महत्या व ७८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११४५ आहे. तर सद्यस्थितीत ३२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.प्राप्त अहवाल-२६२पॉझिटीव्ह अहवाल-१४निगेटीव्ह-२४८
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५५०मयत-७९ (७८+१)डिस्चार्ज-११४५दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२६