अकोला : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात बाधितांच्या आकड्यासोबतच आता या विषाणूच्या बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत मृतकांचा आकडा २१ होता. यामध्ये शुक्रवार, २२ मे रोजी आणखी दोघांची भर पडत तो आता २३ वर गेला आहे. मंगळवार, १९ मे रोजी मृत्यू झालेल्या दोघांचे अहवालासह शुक्रवारी एकूण ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी मृत्यू झालेल्यांमध्ये नायगाव येथील ५० वर्षीय महिला व बाळापूर रोड भागातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज सकाळी आठ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४९ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोल्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, दररोज मोठ्या संख्यने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३४१ होती. यामध्ये शुक्रवारी आठ जणांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी ९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८४ अहवाल निगेटिव्ह असून, आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी, तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. आतापर्यंत २०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १२० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.गुरुवारी १५ जणांना डिस्चार्जकोविड आजारातून सावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर दहा जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवले आहे.प्राप्त अहवाल-९२पॉझिटीव्ह-आठनिगेटीव्ह-८४आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४९मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२०
CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; मृतकांचा आकडा २३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:46 AM
मंगळवारी मृत्यू झालेल्यांमध्ये नायगाव येथील ५० वर्षीय महिला व बाळापूर रोड भागातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ठळक मुद्दे शुक्रवारी एकूण ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णसंख्या ३४९ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शुक्रवारी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.