अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १४ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने पातूर येथील आणखी एक महिला व मुर्तीजापूर तालुक्यातील एक पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७ झाली. तसेच आणखी ९ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९१० झाली आहे. दरम्यान दिवसभरात ४५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात २६७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ५ जणांमध्ये सर्वजण पुरुष आहेत. हे रुग्ण अकोट, अकोला शहरातील गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर आणि अकोट तालुक्यातील करोडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. यात कच्ची खोली, बोरगांव मंजू, तेल्हारा व सिरसो मुर्तिजापुर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.दोघांचा मृत्यूपातुर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि. ५ जुलै रोजी दाखल झाली होती. दुपारनंतर मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मुर्तिजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.४५ जणांना डिस्चार्जमंगळवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, कोविड केअर सेंटर मधून ३६, हॉटेल रिजेन्सी येथून तीन व ओझोन हॉस्पिटल मधून एक अशा ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.२२० अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १९१० (१८८९+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९७ जण (एक आत्महत्या व ९४कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५९३ आहे. तर सद्यस्थितीत २२० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.