अकोला: पावसाच्या दिवसांत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती खरी ठरली असून मागील पंधरा दिवसांत शहरातील उत्तर व दक्षिण झोनमध्ये कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनपा प्रशासनाने दोन्ही झोनमध्ये संशयित रूग्णांचे नमुने (स्वॅब)घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर झोनमधील संभाव्य संकटाची चाहूल लक्षात घेता प्रशासनाच्या स्तरावर पुन्हा एकदा भरतीया रूग्णालयात ‘स्वॅब’सेंटर सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे, सहाय्यक आयुक्त पुनम कळंबे तसेच चारही झोनमधील क्षेत्रीय अधिकाºयांच्या स्तरावर उत्तर व दक्षिण झोनमध्ये स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाच्या स्तरावर नियोजन केल्या जात आहे.
CoronaVrius : भरतीया रूग्णालयात पुन्हा ‘स्वॅब’सेंटर सुरु करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:52 PM