लसीकरणासाठी पुढाकार घ्या! अकाेला: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६० वर्षांवरील वयाेवृध्द नागरिक व गंभीर स्वरूपाच्या व्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी लसीकरण माेहीम राबवली जात आहे. या लसीकरण माेहीमेसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारी करण्यात आले आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
अकाेला: हद्दवाढीनंतर महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या वाकापूर,सुकापूर आदी भागात पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक रहिवाशांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. या भागात हातपंप असले तरी खाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची कुचंबणा हाेत आहे.
बाजारपेठेत गर्दी; नियम पायदळी
अकाेला: शहरात काेराेनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे दिसत आहे. अशास्थितीतही मंगळवारी बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष हाेत असल्याने संसर्गाचा धाेका वाढला आहे.
चाचणी केंद्रांत वाढ करा!
अकाेला: जिल्हाप्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्यासाठी काेराेना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणीसाठी व्यापारी,कामगार व नागरिकांनी पुढाकार घेतला असता चाचणी केंद्रांवर गर्दी उसळली आहे. ही बाब पाहता महापालिकेने चाचणी केंद्रांत वाढ करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. केंद्र वाढविल्यास गर्दी टाळता येइल.
विद्यालयाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमण
अकाेला: शासकीय तंत्र निकेतन विद्यालयाच्या आवारभिंतीलगत स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण थाटल्याचे दिसून येते. शेळी,मेंढीसाठी असणारा चारा या ठिकाणी विक्री केला जाताे. तसेच रिक्षा दुरूस्तीची दुकानेही भिंतीलगत उभारण्यात आली आहेत. याप्रकाराकडे तंत्र निकेतन प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसत आहे.
लसीकरणासाठी कस्तुरबामध्ये गर्दी
अकाेला: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ३ मार्च पासून ६० वर्षांवरील वयाेवृध्द नागरिक व दुर्धर आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी मनपाच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केल्याचे चित्र हाेते. यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले हाेते.