पारस येथील रहिवासी ४२ वर्षीय तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम सुरू केल्यानंतर पहिला हप्ता त्यांना देण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ता देण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर असलेली जिओ-टॅगिंग इंजिनीयर नेहा उत्तमराव म्हैसणे हिने दुसऱ्याच्या बांधकामाजवळ उभा राहून छायाचित्र काढून देण्याचे प्रोत्साहन दाखवून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता स्नेहा म्हैसने हिने लाच मागितल्याचे समोर आले. यावरून तिच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. स्नेहा म्हैसने या आरोपीला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपीने जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
लाचखोर महिला अभियंत्याची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:17 AM