शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

‘कॉटन ब्रोकर’ कैलास थाडास जन्मठेप

By admin | Published: September 22, 2016 1:51 AM

शरीरसुखास नकार देणा-या महिलेची केली होती जाळून हत्या.

अकोला, दि. २१- कामावर असलेल्या मजुराच्या बायकोने शरीरसुखास नकार दिल्यानंतर तिला जिवंत जाळणार्‍या ह्यकॉटन ब्रोकरह्ण कैलास धाडास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिने कैदेच्या शिक्षेचे आदेश दिले. अकोल्यातील कॉटन ब्रोकर कैलास रामेश्‍वर थाडा (४८) याच्याकडे एक कर्मचारी कामावर होता. कामावरील कर्मचार्‍याच्या अहमदनगर येथील नातेवाइकाचा मृत्यू झाल्याने तो पत्नी व मुलांना घेऊन १६ फेब्रुवारी २00८ रोजी गावी जाण्याची तयारी करीत होता; मात्र यावेळी कैलास थाडा याने कर्मचार्‍यास बाहेरगावावरून कापसाचे नमुने आणण्यासाठी पाठविले. कर्मचारी कापसाचे नमुने आणण्यासाठी निघताच थाडा हा कर्मचार्‍याच्या घरी गेला. घरी असलेल्या कर्मचार्‍याच्या मुलाला गाडी दुरुस्त करण्यासाठी त्याने बाहेर पाठविले. त्यामुळे घरात तो आणि त्या कर्मचार्‍याची पत्नी हे दोघेच होते. काही वेळातच थाडाने त्या महिलेला शरीरसुखाची मागणी केली; परंतु महिलेने त्याला विरोध केला. तरीही त्याने जबरदस्ती केल्याने महिलेने त्याच्याशी वाद घालून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या कैलास थाडा याने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. महिलेची आरडाओरड ऐकून शेजारी तेथे पोहोचले त्यांनी महिलेला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यानंतर उपचारासाठी महिलेस रुग्णालयात दाखल केले, यावेळी थाडाही त्यांच्या सोबत होता. त्याने जखमी महिलेला माझे नाव सांगितल्यास तुझ्या मुलांना जीवाने मारेल, अशी धमकी दिली. हेच बयान त्या महिलेने पोलिसांना दिले .९६ टक्के जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान २२ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी नरेंद्र ओमप्रकाश खत्री (४५) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम आकोत यांनी सुरू केला. प्रकरण वेगळे असल्याचे तपासात त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ठाणेदार सुनील सोनोने यांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर हे हत्याकांड समोर आले. पोलिसांनी कैलास थाडा यास अटक केली. या प्रकरणाची सुनावणी मुख्य व जिल्हा सत्रन्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात झाली. त्यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर कैलास थाडा यास खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेश दिले.