१ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी
जिल्ह्यात यंदा कृषी विभागाने १ लाख ५५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते; परंतु ऐन पेरणीच्या काळात पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी क्षेत्रात घट झाली. यावर्षी १ लाख ४० हजार ५४६ हेक्टरवर पेरणी झाली.
१५ ते २० सप्टेंबर पावसाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार अकोला जिल्ह्यात १५ ते २० सप्टेंबर दरम्यान हलका, मध्यम ते अधिक स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर बोंडसडचे प्रमाण वाढले. नवीन येणारे फूल गळून पडत आहे. फुटत असलेला कापूसही गळून पडत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- विष्णू पखाले, शेतकरी, बोर्डी