राजरत्न सिरसाटअकोला: कापसाच्या दरात तेजी आली असून, हे दर प्रति क्विंटल चार हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले. प्रतिक्ंिवटल पाच हजाराच्यावर वाढ होण्याची शक्यता कापूस व्यावसायिकांनी वर्तविली आहे. परंतु बोंडअळीने कापसाचे प्रंचड नुकसान झाले असून, ५० ते ७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकºयांकडे कापूसच नाही मग आता या दरवाढीचा फायदा काय असा प्रश्न शेतक ºयांचा आहे.मागील पाच वर्षात पावसाच्या अनियमिततेचा फटका विदर्भात शेतकºयांना बसला. उत्पादन खर्चावर आधारित दरही न मिळाल्याने खरीप हंगामात शेतकºयांनी कापसाचे क्षेत्र कमी करू न सोयाबीनला पसंती दिली; पण सोयाबीनचे दर खूपच कमी असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही; त्यामुळे शेतकºयांनी यावर्षी कापूस पीक पेरणीवर भर दिला असून, राज्यात १० टक्के कापसाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या भारतीय बाजारपेठेसह सर्वत्र कापसाची मागणी वाढली आहे. परिणामी, कापसाच्या दरात तेजी आली असून, सध्या हे दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.सुरू वातीचा कापूस विकला !राज्यातील शेतकºयांनी सुरू वातीला वेचणी केलेला कापूस विकला,त्यांनतर मात्र अचानक टोळधाड सारखा बोंडअळ््यांनी कापसावर हल्ला केल्याने कापसाचे प्रंचड नुकसान झाले.हजारो शेतकºयांना कापसावर नांगर फिरवावा लागला. त्यामुळे जवळपास ५० ते ७५ लाख गाठी कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.- कापसाच्या दरात तेजी आली असून, हे दर प्रति क्विंटल ४ हजार आठशे पन्नास ते ४ हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले असून, यात आणखी प्रतिक्ंिवटल पाच हजार रू पयांवर वाढ होण्याची शक्यता आहे.- बसंत बाछुका,कापूस उद्योजक,अकोला.
कापसाचे दर वाढणार; प्रतिक्विंटल ५ हजारावर भाव मिळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:29 PM
अकोला: कापसाच्या दरात तेजी आली असून, हे दर प्रति क्विंटल चार हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले. प्रतिक्ंिवटल पाच हजाराच्यावर वाढ होण्याची शक्यता कापूस व्यावसायिकांनी वर्तविली आहे.
ठळक मुद्देभावात आणखी तेजी येण्याची कापूस व्यावसायिकांनी वर्तविली शक्यता.परंतु, बोंडअळीने केले कापसाचे नुकसान.यंदा ५० ते ७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता.