अकोला : कापसाचे दर आणखी २०० ते ३०० रुपयांनी वाढण्याची शक्यता कापूस व्यापारी, तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या बाजारात प्रतिक्ंिवटल ६,५०० ते ६,७५० रुपये दर आहेत; पण शेतकऱ्यांकडे मात्र कापूस कमी असल्याने दरवाढीचा फायदा व्यापाºयांना होणार आहे.फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मार्च महिन्यात या दरात सुधारणा होऊन प्रतिक्विंटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे सहा हजार रुपये दर होताच व्यापाºयांनी खेडा खरेदी म्हणजे गावा-गावात जावून कापूस खरेदी केला. थेट दारात सहा हजार रुपये दर मिळत असल्याने त्यावेळी बºयाच शेतकºयांनी कापूस विक्रीस काढला. ज्या शेतकºयांकडे साठवणुकीसाठीची सोय आहे त्यांनी मात्र दर वाढतील या प्रतीक्षेत कापूस घरीच ठेवला होता. दरम्यान, एप्रिल महिन्याचा दुसरा आडवडा सुरू होताच पुन्हा कापसाच्या दरात दमदार सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्ंिवटल ६,५०० ते ६,७५० रुपयांपर्यंत पोहोचले. अकोला जिल्ह्यातील अकोेट भागात तर शेतकºयांना प्रतिक्विंटल सात हजार रुपये मिळाले. दरम्यान, खेडा खरेदीमध्ये जवळपास शेतकºयांनी कापूस विकल्यानंतर पंधरा दिवसात कापसाचे दर वाढल्याने आता या दरवाढीचा फायदा शेतकºयांना नव्हे तर व्यापाºयांना होणार असल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे.
देशात आजमितीस दोन कोटी ६५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, राज्यात जवळपास ७० लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. आता दर वाढल्याने शेतकºयांनी कापूस विक्रीस काढला आहे. आणखी २०० ते ३०० रू पयांनी दर वाढण्याची शक्यता आहे.बसंत बाछुका,कापूस उद्योजक,अकोला.