लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कापसाचे दर वाढले असून, खासगी बाजारात प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपयापर्यंत दर पोहोचले आहेत. पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करण्यावर भर दिल्याने बाजारात कापसाची आवक वाढली आहे.यावर्षी अतिपावसाचा फटका बसल्याने कापसाचा उतारा घटला आहे. पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेचणीचा वेग वाढवला आहे. ज्यांच्याकडे कापूस ठेवण्याची व्यवस्था नाही त्या शेतकºयांनी कापूस विक्रीवर भर दिला आहे. केंद्र शासनाने यावर्षी धाग्याच्या लांबीनुसार कापसाची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५,५२५ ते लांब धाग्याच्या कापसाला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत. विदर्भात बहुतांश भागात आखूड धाग्याच्या कपाशीचे उत्पादन घेतले जाते. खासगी बाजारात सुरुवातीला चांगले दर मिळाले. त्यानंतर हे दर कमी झाल्याने शेतकºयांनी भारतीय कापूस महामंडळ व महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला कापूस विकला. तेथे शेतकºयांना दरही चांगले मिळाले.आता खासगी बाजारातील दर वाढले असून, कापूस विकलेला पैसा तत्काळ हातात मिळत असल्याने शेतकºयांनी व्यापाºयांना कापूस विकणे सुरू केले आहे. खासगी बाजारातील दर आजमितीस प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. सोमवार, ३० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अकोटच्या बाजारात प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपये दर मिळाले.जिल्ह्यात अनेक भागात कपाशीचे पीक उभे असून, काही भागातील कपाशीची स्थिती उत्तम आहे. झाडाला मोठ्या प्रमाणात बोंडे आहेत; परंतु बोंडे फुटून कापूस बाहेर येण्यास विलंब होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कापूस वेचणी हंगाम लांबणार आहे. कपाशीवर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कापूस वेचणी झाली असेल तर कापूस नांगरू न टाकण्याची शिफारस कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे; परंतु हंगामच लांबल्याने शेतकरी जानेवारी महिन्यानंतरच कापसावर नांगर फिरवतील, असेच ग्रामीण भागातील चित्र आहे.खासगी बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर शासकीय कापूस खरेदीबरोबर आल्याने खासगी बाजारात कापसाची आवक वाढत आहे. या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.- बसंत बाछुका,कापूस उद्योजक,अकोला.
अकोला जिल्ह्यात कापसाचे दर वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:08 PM