अकोला : खासगी बाजारात कापूस दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, मंगळवारी हे दर प्रतिक्विंटल ५४६५ रुपयांवर पोहोचले. या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली. राज्यात आतापर्यंत ११ लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. यातील साठ टक्के कापूस (सीसीआय) भारतीय कापूस महामंडळाने खरेदी केला आहे. यावर्षी शेतकºयांनी कापूस पीक पेरणीवर भर दिला असून, राज्यात १ लाख हेक्टरने हे क्षेत्र वाढले आहे; परंतु अतिपावसाचा फटका बसल्याने कापसाचा उतारा मात्र घटला आहे. सध्या कापूस वेचणी सुरू असून, शेतकºयांनी कापूस विक्री सुरू केली आहे. देशात आतापर्यंत ७० लाख गाठी कापसाची खरेदी झाली असून, राज्यात ११ लाख गाठी खरेदी करण्यात आला आहे. यातील ६० टक्के कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. उर्वरित कापूस व्यापाºयांनी खरेदी केला आहे. राज्यात सीसीआय, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व व्यापाºयांनी खरेदी केली. केंद्र शासनाने यावर्षी धाग्याच्या लांबीनुसार कापसाची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कापसाला प्रतिक्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कापसाला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत. विदर्भात बहुतांश आखूड धाग्याच्या कपाशीचे उत्पादन घेण्यात येते. कापूस वेचणी हंगामाच्या सुरू वातीला खासगी बाजारात या कापसाला आधारभूतपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकºयांनी पणन महासंघ व सीसीआयला कापूस विक्री केली; परंतु अद्यापही कापसात ओलावा असल्याने असा कापूस सीसीआय व पणन महासंघाच्या निकषात बसत नाही. सोमवार, ९ डिसेंबरपासून खासगी बाजारातील दर वाढल्याने शेतकºयांनी खासगी व्यापाºयांकडे कापूस विक्री सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २,७३० व इतर ठिकाणी मिळून ९ हजार क्ंिवटलच्यावर कापसाची खरेदी झाली. - बाजारात सध्या प्रतिक्ंिवटल ५,३५० ते ५,४६५ रुपये दर आहेत. आंतरराष्टÑीय बाजारात धागा व होजीअरीसाठी कापसाची मागणी वाढल्याने दरात तेजीची शक्यता आहे. बसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.
खासगी बाजारात कापसाचे दर ५,४६५ रुपयांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 7:36 PM